बंद

जिल्ह्याविषयी

भंडारा जिल्ह्याच्या विभाजनाने गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. गोंदिया जिल्हा, महाराष्ट्र राज्याच्या उत्तर-पूर्व बाजूला असुन मध्य प्रदेश आणि छत्तीसगढच्या राज्यांच्या सीमा आहेत.

जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 1322635 आहे. पुरुष आणि महिलांची लोकसंख्या अनुक्रमे 662656 आणि 659964 आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जाती आणि जमाती लोकसंख्या 355484 आणि 30922 आहे. जिल्ह्याचे साक्षरतेचे प्रमाण 84.95% आहे.

हा जिल्हा अविकसीत असुन बहुतेक जमीन जंगलाने व्यापलेली आहे. शेतीचे मुख्य पिक भात आहे. जिल्ह्यातील अन्य कृषी उत्पादन ज्वारी, अळशी, गहू आणि तूर आहे. लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.

हा जिल्हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला असुन संपूर्ण जिल्ह्यात कोणतेही मोठे उद्योग नाहीत. भात हे शेतीचे मुख्य पिक असल्यामुळे जिल्ह्यात तांदळाच्या ब-याच गिरण्या आहेत. गोंदिया जिल्हा ‘राईस सिटी’ म्हणून ओळखले जाते.

हा जिल्हा 4 उपविभागांमध्ये गोंदिया, देवरी, तिरोडा आणि मोरगांव अर्जुनी विभागलेला आहे. गोंदिया उपविभागांत 1 तालुका आहे, देवळी उपविभागामध्ये 3 तालुके आहेत, तिरोडा उपविभागांमध्ये दोन तालुके आहेत आणि मोरगाव अर्जुनी उपविभागामध्ये 2 तालुके आहेत.एकुण 556 ग्रामपंचायती व 954 गावे आहेत. जिल्ह्याचे क्षेत्र गोंदिया, तिरोडा, गोरेगांव, आमगाव, लाखांदूर आणि साकोली या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये विभागले आहे.

मुळात या जिल्ह्यात 8 तालुके व 8 पंचायत समित्या आहेत. गोंदिया आणि तिरोडा असे दोन नगर परीषद आहेत. वैनगंगा नदी ही सर्वात मोठी व सर्वात महत्वाची नदी आहे. बाग, चुलबंद, गढवी व बावनथडी सारख्या नद्या वैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत.