जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचा संदेश
हे संकेतस्थळ प्रामुख्याने गोंदिया जिल्ह्यातील मतदार आणि निवडणूक विभाग, गोंदिया यांच्यातील संवादासाठी तयार करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय व अधीनस्थ कार्यालयांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध निवडणूक विषयक उपक्रमांची माहिती मतदारांना दिली जाते. निवडणूक विषयक विविध महत्त्वाची माहिती ही डाऊनलोड करण्यासाठी संकेतस्थळावर उपलब्ध आहे.