बंद

लोक आणि संस्कृती

जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 1322635 असून त्यात 662656 पुरुष आणि 659964 महिला (2011 च्या जनगणनेनुसार) समाविष्ट आहे. लोकसंख्येची घनता 253 प्रति चौ.कि.मी. आहे.

जिल्ह्यातील आदिवासी समुदायाची स्वतःची संस्कृती आहे. ते “पर्सा पेन” या देवाची उपासना करतात. ते शुभ प्रसंगी आणि नवीन पिके येतात तेव्हा “रेला” हे नृत्य करतात. “रेला” हे नृत्य आदिवासी समुदायात लोकप्रिय नृत्य आहे. “ढोल” नृत्य हे सुद्धा लोकप्रिय नृत्य आहे . आदिवासींचे मुख्य उत्सव होळी, दशहरा आणि दिवाळी हे मुख्य उत्सव आहेत. आदिवासी घनदाट जंगलात राहतात.

इतर समाजातील लोक गणपती, दसरा, दिवाळी आणि होळी हे सण प्रामुख्याने साजरा करतात. जिल्ह्याच्या काही भागात, लोक नाटकांंमध्ये भूमिका बजावण्यास इच्छुक असतात. दिवाळीनंतर किंवा इतर सणा निमीत्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

स्थानिक महोत्सव

उत्सवाचे नाव कालावधी / महिना
संक्राती जानेवारी
महाशिवरात्री फेब्रुवारी
होळी मार्च
नवरात्र एप्रील
राम नवमी एप्रील
गुढी पाडवा एप्रील

स्थानिक सांस्कृतिक लोकनृत्य: दंडर आणि गोंडी नृत्य.

बोली भाषा – हिंदी, मराठी, गोंडी, पोवार