कसे पोहोचाल?
गोंदिया शहर, विदर्भातील नागपूर पासून 170 किमी अंतरावर आहे. राज्य परिवहन बसने गोंदिया – नागपुर प्रवास करण्यास सुमारे 5 तासांचा अवधी लागतो. गोंदिया – नागपुर रेल्वे मार्गे अंतर हे 130 किमी आहे.
गोंदिया जिल्ह्यातील वाहतूकी बाबत महत्वाचे ठळक मुद्दे खालील प्रमाणे आहेत:
- राष्ट्रीय महामार्ग संख्या — 1 (राष्ट्रीय महामार्ग-6)
- कि.मी. मध्ये राष्ट्रीय महामार्ग — 34 कि.मी.
- कि.मी. मध्ये राज्य महामार्ग — 401 कि.मी.
- कि.मी. मध्ये जिल्ह्यातील इतर रस्ते — 678.86 कि.मी.
- एसटी डेपो — 2 (गोंदिया, तिरोडा)
- एसटी बस उपलब्ध नसलेल्या गावांची संख्या — 271
- कि.मी. मध्ये रेल्वे मार्ग — 181.8 कि.मी.
- रेल्वे पुलांची संख्या — 1 चुलबंद
- महत्वाच्या रेल्वे स्थानकांची संख्या — 3 (गोंदिया, तिरोडा, आमगाव)
- विमानतळांची संख्या — 1 बिर्सी
- पोस्ट ऑफिस संख्या — 161