हवामान आणि पाऊस
हवामान
गोंदिया जिल्ह्याचे तपमानात तिव्र स्वरुपाचा बदल आढळुन येतो. उन्हाळा अतिशय गरम आणि हिवाळा अतिशय थंड असणारा अनुभव आहे. सरासरी सापेक्ष आर्द्रता 62 टक्के असुन वर्ष 2011 मध्ये किमान तापमान 7.4 डीसी आणि कमाल तापमान 47.5 डीसी नोंदविण्यात आले आहे.
पाऊस
गोंदिया जिल्ह्यात प्रामुख्याने दक्षिण-पश्चिमी वा-या पासुन पाऊस येतो.
पावसाळी हंगाम हे जून ते सप्टेंबर महिन्या पर्यन्त असुन माहे जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांमध्ये सातत्याने आणी सर्वाधिक पाऊस पडतो.