महत्वाची ठिकाणे
नवेगाव राष्ट्रीय उद्यान
हे उद्यान गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिणेला वसलेले आहे. हे महाराष्ट्र राज्याच्या पूर्व भागात स्थित असुन 133.78 चौ.कि.मी. क्षेत्रफळ आहे. निसर्ग संवर्धनाच्या दृष्टिकोणातून या उद्यानाला अतिशय महत्व आहे.
या राष्ट्रीय उद्यानात पक्ष्यांच्या 209 प्रजाती, सरपटना-या प्रणांच्या 9 प्रजाती आणि 26 सस्तन प्रजाती आहेत यामध्ये वाघ, बिबट, जंगली मांजर, स्मॉल इंडिया सिव्हेट, पाम कॅव्हेट, लांडगा इ. यांचा समावेश आहे.
नागझिरा अभयारण्य
नागझिरा अभयारण्य भंडारा जिल्हा आणि गोंदिया जिल्ह्याच्या मध्यात आहे. साकोलीपासून फक्त 22 किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 (बॉम्बे – कलकत्ता) वर आहे. जैव-विविधता संवर्धन या दृष्टिकोणातून देखील या अभयारण्याला अत्यंत महत्व आहे. हे अभयारण्य, निसर्गरम्य परिसराने, विलासीत हिरव्या वनस्पतींसह सुशोभित केले आहे. निसर्गाचे अन्वेषण आणि प्रशंसा करण्याच्या दृष्टिने हे अदभुत बाह्य मैदानीय नैसर्गीक संग्रहालय असे आहे.
कचारगढ
कचारगढ हे गोंदियापासून 55 कि.मी अंतरावर आहे. येथे प्रसिद्ध 25000 वर्ष जुन्या नैसर्गिक गुहा असल्यामुळे पर्यटकांचे हे लोकप्रिय स्थळ आहे. येथे पुरातण वस्तूशास्त्रज्ञांना दगडांचे शस्त्र सापडले आहेत जे त्या काळातील लोक उपयोग करीत होते . हे घनदाट जंगलात वसलेले असून ट्रॅकिंग करीता उपयुक्त असे स्थळ आहे. स्थानिक रहीवासी यांचे साठी पूजेचे हे स्थान आहे.
हाजरा फॉल
गोंदिया जिल्ह्या पासुन हे सालेकसा तालुक्यात 50 किमी अंतरावर आहे. पावसाळ्यात पर्यटक येथील पाण्याच्या झ-याचा आनंद घेवु शकतात. सभोवताली घनदाट जंगल, हिरवी वनस्पती असुन हे चांगले कॅम्पिंग साइट सुद्दा आहे. दरेकसा रेल्वे स्थानका पासून फक्त 1 किमी अंतरावर आहे.
पदमपुर
पदमपुर गाव हे अमगाव तालुक्यात वसलेले असून प्रसिद्ध संस्कृत लेखक भवभूतीचे जन्मस्थान आहे. भवभूति यांनी उत्तर रामचरिता, मालती माधवा आणि महावीर चरीत्र यासारख्या संस्कृत नाटक लिहिले आहेत. या गावात अनेक प्राचीन मूर्ती आढळतात.
चुलबंध धरण
चुलबंद धरण गोंदिया पासुन 25 किमी अंतरावर गोरेगाव तालुक्यात आहे. हे पाणलोट क्षेत्र हिरव्या टेकडावर असुन अतीशय आर्कषक धरण आहे.
डाक्राम सुकडी
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तहसील येथे वसलेले डाक्राम सुकडी, चक्रधर स्वामी मंदिरासाठी ओळखल्या जाते. मंदिरापासून 1 किमी अंतरावर बोडलकसा धरण आहे.
कामठा
जिल्ह्यापासुन 15 किमी अंतरावर. ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे. मागील शतकातील कामठा जमीनदारांचे प्रशासकीय मुख्यालय.
सूर्यदेव मांडो देवी
मांडोदेवी आणि सूर्यदेव मंदिर हे जिल्ह्यापासून 26 किमी अंतरावर आहे. मांडोदेवीचे मंदिरात ‘नवरात्र उत्सव’ मध्ये भक्तांतर्फे पुजा केली जाते.
तिबेटी कॅम्प
तिबेटी शिबिर गोठनगांव येथे असुन लोकप्रिय पर्यटनस्थळां पैकी एक आहे. हे शिबिर तिबेटी शरणार्थी यांंचे वास्तव्याचे ठिकाण आहे. पर्यटक या ठिकाणी बौद्ध मंदिर आणि तिबेटी महत्वाचे इतर प्रेक्षणीय आकर्षणे बघण्याकरीता भेट देतात.
नागरा
नागरा गाव गोंदिया शहरापासून 5 किमी अंतरावर असून हे पर्यटक व भाविकांसाठी प्रसिध्द आहे. पंधराव्या शतकात हेमाडपंथी पद्धतीने बांधकाम करण्यात आलेले शीव मंदिर, ही या गावाची ओळख. तथापी, येथे खूप संखेने इतर देऊळ सुद्धा आहेत.
प्रतापगढ
प्रतापगढ हे अर्जुनी मोरगाव तालुक्यात असून नवेगाव बंध राष्ट्रीय उद्ध्यानापासून जवळपास २० कि.मी. अंतरावर आहे. दरवर्षी महाशिवरात्री हा उत्सव प्रतापगढ येथे साजरा केला जातो, 3 दिवसाचा हा सण स्थानिक प्राधिकरणाद्वारे आयोजित केला जातो. त्या ठिकाणी भगवान शंकराची ३० फुट उंच अशी भव्य मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे.