बंद

नवेगाव राष्ट्रीय उद्यान

दिशा

हे उद्यान गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिणेला वसलेले आहे. हे महाराष्ट्र राज्याच्या पूर्व भागात स्थित असुन क्षेत्रफळ 133.78 चौ.कि.मी आहे. निसर्गाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोणातून या उद्यानाला अत्यंत महत्व आहे. या उद्यानाची नैसर्गीक संपत्ती खरंच अतुलनीय आहे आणि सर्वांनी इथल्या नयनरम्य दृश्यांची, शुद्ध आणि ताजी हवा यांचा आनंद उपभोगण्&याकरीता नवेगाव येथे भेट देणे आवश्यक आहे. जैवविविधता संरक्षण करण्याच्या दृष्टिने देखील या उद्ययानात प्रचंड क्षमता आहे.
या राष्ट्रीय उद्यानात कोरड्या मिश्र जंगला पासुन ते ओलसर वन पर्यन्त विविध प्रकारचे वनस्पती आहे. नवेगाव उद्यानात पक्ष्यांच्या 209 प्रजाती, 9 प्रजाती सरीसृप आणि 26 सस्तन प्रजाती आहेत ज्यात वाघ, बिबळ्या वाघ, जंगली मांजर, कस्तुरी मांजर, पाम कॅव्हेट, लांडगा इ. यांचा समावेश आहे. उद्यानामध्ये व्याख्यान केंद्र, लहान संग्रहालय आणि ग्रंथालय सुविधा उपलब्ध आहेत. वन्यजीव निरीक्षण आणि छायाचित्रीकरण करणेकरीता उद्ययानात सात वॉच केबिन आणि पाच वॉच टॉवर्स आहेत.

या राष्ट्रीय उद्यानात नवेगावबांध तलावाचे क्षेत्रफळ 11 चौ. कि.मी आहे. अठराव्या शतकात कोलु पटेल कोळी यांनी हे तलाव बांधले होते, अशी आख्यायिका आहे. सध्या, कोलासूर देव या नावाने ओळखल्या जातो आणि त्यांंचा पुतळा देखील तलावाच्या सभोवताल एक शिखरावर आढळतो.

छायाचित्र दालन

  • नवेगाव ओपन बील स्‍टॉर्क
    नवेगाव ओपन बील स्‍टॉर्क
  • नवेगाव टेहाळणी बुरुज
    नवेगाव टेहाळणी बुरुज
  • नवेगाव येथील तलाव
    नवेगाव येथील तलाव

कसे पोहोचाल? :

विमानाने

नागपूर विमानतळ हे सर्वात जवळचा विमानतळ आहे. नंतर नवेगाव हे रस्त्याच्‍या प्रवासाने गाठले जाऊ शकते.

रेल्वेने

देवळगाव रेल्वे स्थानकापासून 3 (तीन) किमी दूर आहे. गोंदिया ते बल्हारशाह रेल्वे स्थानकादरम्यान स्थित आहे.

रस्त्याने

नवेगाव - नागपुर अंतर 132 कि.मी. (नागपूर-भंडारा-साकोली-नवेगाव). देवळगाव - नवेगाव अंतर 1 किमी भंडारा. नागपूर ते नवेगावपर्यंत राज्य परिवहन बस उपलब्‍ध.