बंद

नागझिरा अभयारण्य

दिशा

नागझिरा वन्यजीव अभयारण्य हे महाराष्ट्र राज्याच्या पूर्व भागात असुन “हिरवा ओएसिस” चे चमत्कारिकरित्या जतन करुन ठेवले आहे. जैव-विविधता संवर्धन या दृष्टिकोणातून देखील या अभयारण्याला अत्यंत महत्व आहे. हे अभयारण्य, निसर्गरम्य परिसराने, विलासीत हिरव्या वनस्पतींसह सुशोभित केले आहे. निसर्गाचे अन्वेषण आणि प्रशंसा करण्याच्या दृष्टिने हे अदभुत बाह्य मैदानीय नैसर्गीक संग्रहालय असे आहे. हे वन्यजीव अभ्यारण्य निसर्गाची अनमोल संपत्ती असुन, सर्वांनी निसर्गरम्य सुंदरतेचा, शुद्ध आणि ताज्या हवेचा आनंद घेण्यासाठी भेट देणे आवश्यक आहे. हे अभयारण्य आमच्यासाठी वरदान असे आहे आणि म्हणून आपल्याला निसर्गाच्या या भव्य संपत्तीचे खरे मूल्य लक्षात आले पाहिजे आणि आपल्या राष्ट्रीय परंपरेचा एक भाग म्हणून संरक्षण करणे आवश्यक आहे. जैव-विविधता संवर्धनाच्या दृष्टिने देखील या अभयारण्यात अफाट क्षमता आहे.

हे अभयारण्य, मध्य भारतात विशेषतः विदर्भातील महत्वाचे संवर्धन केंद्र आहे. हे मानवी वसाहती करीता “हरित-फुप्फुस” प्रमाणे कार्य करते आणि पर्यावरण संतुलन राखण्यास सहायक असे आहे.

प्राणीशास्त्रीय मूल्ये

हे अभयारण्य अनेक लुप्त होत असलेल्या प्राण्यांचे घर आहे. येथे पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये मासे, 34 प्रकारचे सस्तन प्राणी, स्थानिक आणी स्थलांतरित जमीन व पाण्यात वावरना-या पक्ष्&यांच्या सुमारे 166 प्रजाती, सरपटणा-या प्राण्यांंच्या सुमारे 36 प्रजाती आणि 4 उभयचर प्रजाती आहेत. हे अभयारण्य पक्ष्यांच्या वास्तव्याकरीता लक्षणीय स्थान आहे आणि पक्षी पाहणाऱ्यांंकरीता नंदनवन आहे. या अभयारण्यातील प्राणीशास्त्रीय मूल्ये थोडक्यात खाली दिली आहेत.

अपृष्ठवंशी

हे अभयारण्य असंख्य कीटक आणि मुंग्या जातीच्या प्रजातींच्या निवासस्थान आहे. फुलपाखरूंंच्या सुमारे 49 प्रजाती (9 श्रेणीत विभागलेल्या) आहेत. यामध्ये महत्वाच्या प्रजातींंमध्ये म्हणजे सामान्य गुलाब, कॉमन मॉर्मन, लिंबू बटरफ्लाय, कॉमन सेलर, कॉमन इंडियन क्रो, ब्लॅक राजा इ. आहेत.

सस्तन प्राणी

या अभयारण्यामध्ये जवळजवळ 34 सस्तन प्राण्यांंच्या प्रजाती आहेत जे 8 नैसर्गिक अनुक्रमांमध्ये व 16 श्रेणी मध्ये विभागलेले आहेत. यापैकी 14 लुप्त होत असलेल्या प्रजाती आहेत. यामध्ये वाघ, बिबळ्या, जंगली मांजर, स्मॉल इंडियन कस्तुरी मांजर, पाम कस्तुरी मांजर, लांडगा, अस्वल, चार शिंगी काळवीट, माउस डियर, पॅन्गोलिन इ. चा समावेश आहे.

पक्षी

या अभयारण्यातील सर्वात आकर्षक वन्यजीव वैशिष्ट्य. येथे 16 अनुक्रमांमध्ये, 47 कुटुंबांची सुमारे 166 पक्ष्यांच्या प्रजाती नोंदवील्या गेल्या आहेत. तसेच स्थलांतरित पक्ष्यांच्या 15 प्रजाती आणि स्थानिक स्थलांतरित 42 प्रजाती आढळतात. एक उल्लेखनीय पक्षी, “Bar-headed Goose”, जो लद्दाख आणि तिबेटपासून या अभयारण्यच्या शेजारी असलेल्या चोरकामारा तलावात वास्तव्यास येतो. लुप्तप्राय स्थितीचे 13 पक्ष्यांच्या प्रजाती आहेत ज्यामध्ये मोर आणि “एसिप्रिट्रिडे” कुटुंबातील पक्षी समाविष्ट आहेत.

सरपटणारे प्राणी

या अभयारण्यात सरपटणा-या प्राण्यांच्या 36 प्रजाती आढळतात जे दोन नैसर्गिक अनुक्रमणीकांंमध्ये आणि 11 कुटुंबांमध्ये विभागले आहेत. या पैकी 6 प्रजातींंचा लुप्त होत असलेल्या प्रजाती मध्ये समावेश केला आहे जसे. इंडियन लॉक पायथन, धामन, इंडियन कोबरा, रसेल वायपर, चेकर्ड किलबॅक आणि कॉमन मॉनिटर.

भूजलचर

हे अभयारण्य मनोरंजक आणी विवीध प्रकारच्या बेडकांचे घर आहे जसे ट्री-फ्रॉग, बुल-फ्रॉग, सहा-पायी बेडूक, रामानेला मोंटाना इ.

मासे

या अभयारण्यातील तलाव अनेक प्रकारच्या मास्यांकरीता प्रचलित आहेत.

छायाचित्र दालन

  • नागझिरा येथील वाघ
    नागझिरा येथील वाघ
  • भारतीय गवा नागझिरा
    नागझिरा येथील भारतीय गवा
  • नागझिरा येथील ब्लॅकबक
    नागझिरा येथील ब्लॅकबक

कसे पोहोचाल? :

विमानाने

नागपूर विमानतळ हे सर्वात जवळचा विमानतळ आहे. नंतर नवेगाव हे रस्त्याच्‍या प्रवासाने गाठले जाऊ शकते.

रेल्वेने

तिरोडा रेल्वे स्थानकापासून 15 (पंधरा) किमी अंतरावर आहे. गोंदिया आणि भंडारा रेल्वे स्थानकां दरम्यान मुंबई-हावडा मुख्य मार्गावर स्थित आहे.

रस्त्याने

नागझिरा वन्यजीव अभयारण्य साकोली पासून फक्त 22 किमी, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर (मुुुुम्‍बई - कोलकाता) आहे . गोंदिया जिल्हा मुख्‍यालयापासुन हे उभयारण्‍य 60 किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील बसस्थानक साकोली आणि तिरोडा येथे आहे. साकोली पासुन पेटेझरी फाटक 10 कि.मी अंतरावर असुन चोरकामारा फाटक हे तिरोडा पासून 20 किमी अंतरावर आहे. जवळचे रेल्वे स्थानके ; अ) गोंदिया 50 कि.मी. ब) भंडारा रोड 50 कि.मी. क) सौंदड 20 किमी ड) तिरोडा 20 कि.मी. सर्वात जवळचे विमानतळ नागपूर (~ 100 किमी) आणि गोंदिया (~ 70 किमी)