राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (NIC) बद्दल
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY) अंतर्गत असलेले राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (NIC) हे भारत सरकारचे प्रौद्योगिकी भागीदार आहे. केंद्र आणि राज्य सरकारांना तंत्रज्ञान-चालित उपाय प्रदान करण्याच्या उद्देशाने 1976 साली एन आय सी ची स्थापना करण्यात आली. एनआईसी चा अधिदेश आहे:
- सरकारचे प्रौद्योगिकी भागीदार आहे
- सरकारसाठी माहिती तंत्रज्ञान प्रणालीची रचना आणि विकास
- सरकारला आय सी टी पायाभूत सुविधा प्रदान करणे
- उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या वापराबाबत शोध घेणे आणि सल्ला देणे