जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचा संदेश
हे पोर्टल प्रामुख्याने गोंदिया जिल्ह्यातील मतदार आणि निवडणूक विभाग, गोंदिया यांच्यातील संवादासाठी तयार करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय व अधीनस्थ कार्यालयांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध निवडणूक विषयक उपक्रमांची माहिती मतदारांना दिली जाते. निवडणूक विषयक विविध महत्त्वाची माहिती ही डाऊनलोड करण्यासाठी संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या पूर्ण देखरेखीखाली आणि नियंत्रणाखाली काम करते. गोंदिया जिल्ह्यात ६३-अर्जुनी मोरगाव, ६४-तिरोरा, ६५-गोंदिया आणि ६६-आमगाव असे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. ६३-अर्जुनी मोरगाव येथे एकूण ३१८, तिरोरा येथे २९५, ६५-गोंदिया येथे ३६१ तर ६६-आमगाव येथे ३११ मतदान केंद्रे आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यात एकूण १२८५ मतदान केंद्रे आहेत.
मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावावा