बंद

भारतीय निवडणुक आयोग – SIR-२०२६

SIR, म्हणजे ‘विशेष सखोल’ पुनरवलोकण (Special Intensive Revision). हे भारतीय निवडणुक आयोगजी व्यापक मोहीम आहे. निवडणुकांपूर्वी मतदार यद्यांची अचूकता आणि सर्वसामावेशता सुनिश्चित करण्यासाठी त्या अद्ययावत करणे आणि त्यांची पडताळणी करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.

 

विशेष सखोल पुनरवलोकण (SIR) आढावा 

मतदार यद्याचे अचूक, पूर्ण आणि अद्ययावत
असल्याची खात्री करण्यासाठी भारतीय
निवडणुक आयोगाने (ECI) हाती घेतलेला
'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) हा एक
महत्वपूर्ण उपक्रम आहे. विशेषतः मोठ्या
निवडणुकांपूर्वी, भारतातील निवडणूक
प्रणालीची विश्वासार्हता आणि सचोटी
टिकवून ठेवण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत
महत्त्वाची आहे.
Collector Sir

श्री मंदार पत्की (भा.प्र.से.)

जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, गोंदिया

SIR ची उद्दिष्टे

  1. पात्र मतदारांचा समावेश: SIR चे मुख्य उद्दिष्ट सर्व पात्र नागरिकांना (१८ वर्षे व त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना)
    मतदार यादीत समाविष्ट करणे हे आहे, जेणेकरून कोणताही पात्र मतदार या प्रक्रियेतून वगळला जाणार नाही याची
    खात्री करता येईल.
  2. अपात्र नोंदी वगळणे: मतदार यादीची अचूकता व शुद्धता राखण्यासाठी, मृत व्यक्तींची नावे, स्थलांतरित झालेले
    लोक किंवा दुबार नोंदी वगळणे हे 'SIR' चे उद्दिष्ट आहे.
  3. अचूकता आणि पारदर्शकता: सखोल पडताळणी प्रक्रिया राबवून, SIR मतदार याद्यांची अचूकता वाढवते;
    निष्पक्ष निवडणुकांसाठी ही बाब अत्यंत आवश्यक आहे.