SIR, म्हणजे ‘विशेष सखोल’ पुनरीक्षण (Special Intensive Revision). हे भारत निर्वाचन आयोगाची व्यापक मोहीम आहे. निवडणुकांपूर्वी मतदार यद्यांची अचूकता आणि सर्वसामावेशता सुनिश्चित करण्यासाठी त्या अद्ययावत करणे आणि त्यांची पडताळणी करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.
विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) आढावा
मतदार यद्याचे अचूक, पूर्ण
आणि अद्ययावत असल्याची
खात्री करण्यासाठी भारत
निर्वाचन आयोगाने (ECI)
हाती घेतलेला 'विशेष सखोल
पुनरीक्षण' (SIR) हा एक
महत्वपूर्ण उपक्रम आहे.
विशेषतः मोठ्या निवडणुकांपूर्वी,
भारतातील निवडणूक प्रणालीची
विश्वासार्हता आणि सचोटी
टिकवून ठेवण्यासाठी ही प्रक्रिया
अत्यंत महत्त्वाची आहे.